
आरती नागद्वारा
आरती नागद्वारा लिरिक्स
आरती नागद्वारा लिरिक्स आरती नागद्वारा, शेषशाई अवतारा,
सद्भावे ओवाळितो, पावे दिगंबर द्वारा ।
आरती नागद्वारा ।।धृ ।।
मेरुच्या शिखरी जडले, सिंहासन भारी ।
त्यावर बैसुनिया, सृष्टी रचली या सारी ।।१।।
आरती नागद्वारा......
श्रीराम अवतारी, बंधू लक्ष्मण होशी ।
पाळली राम आज्ञा, पुर्ण कार्य तू करशी ।।२।।
श्रीकृष्ण अवतारी, ज्येष्ठ बंधू बळीराम ।
प्रताप थोर होतो, जगी मिळविले नाव ।।३।।
श्रावण महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र ।
आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ।।४।।
शेष सिंधु सागरात, शेषसाई अनंत ।
तेथे तुम्ही नांदता हो, ज्याला म्हणतात लक्ष्मीकांत ।।५।।
कालीया नांव तुझे, घेता उतरले ओझे ।
स्मरण केली या हो, देवा सार्थक होई माझे।।६।।
देवा मी ज्ञान धरीले, दुःख माझे हरीले ।
हरीला सेवा केली, शंकर मजला पावले ।।७।।
वैशाख महिन्यात, दिवस नागपंचमी रात्र ।
आनंद थोर होतो देवा तुझ्या मंडपात ।।८।।
आज देव शेषराये, भक्ती तुझी पुर्ण होय ।
नवखंड पृथ्वीशी, देवा भरुनी आला आहे ।।९।।
पाचतत्व पंच ज्योती, ओवळीले नागनाथा ।
भक्तजन आरत्या गावी, जागा चारणापाशी द्यावी ।।१०।।
आरती नागद्वारा, गणेश गायन करी ।
नित्य नेम महाभारी, सर्वदिन सेवा करी ।।११।।
ॐ जय शिव ओंकारा आरती लिरिक्स
नागद्वारची आरती मराठी -
ऐसे ही सुन्दर भजन आप यहां पर देख सखते है
गणेश जी के भजन
विट्ठलाचे अभंग मराठी
राधा कृष्ण के भजन
कृष्णाच्या गवळणी मराठी
शिव जी के भजन
गुरुदेव के भजन
माता रानी के भजन
दादाजी धुनिवाले के भजन
साईं बाबा के भजन
देश भक्ति गीत
राम जी के भजन
फ़िल्मी तर्ज पर भजन
हनुमान जी के भजन
बधाई गीत
आरति संग्रह
चालीसा संग्रह
आरती
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.

