
कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा
शोभून दिसतो का नोटावर
किती शोभाला असता भीम नोटावर
टाय आणि कोटावर
खरा देशप्रेमी ठरला भीम घटनाकार
विद्देलाही पुरून उरला असा विद्द्यादार
देशा सावरल त्या गांधीला तारल
पेणाच्या त्या टोकावर
राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते
त्यात एक महान माझे भीमराव नेते
ना कधीच हरले मागे ना सरले
केला इशारा त्या बोटावर
सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले
म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले
मित्तल अंबानी ऋणी भीमाचे
थोर उपकार टाटा वर
कोटी कोटी ह्या दिंनांचा भीम वाली ठरला
बहुजनांच्या हितासाठी देशो देशी फिरला
अमोल किर्ति गाजे भुवरती
सर्वांच्या या ओठावर
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.



