
तुम्ही खाता त्या भाकरीवर
माय बापाहुन भीमाच हो..
माय बापाहुन भीमाच,
उपकार लय हाय र हो..
तुम्ही खाता त्या भाकरीवर,
बाबासाहेबांची सही हाय र.।।
उपकार लय हाय र हो…2
बाबासाहेबांची सही हाय र…2
या सहीची किमया न्यारी
गेली बदलून दुनिया सारी,
आन दारीद्रय दूर पळाले,
आले वैभव घरोघरी…2
तुझी वाढली किंमत…2
कुणाच्या पायी हाय र हो..
बाबासाहेबांची सही हाय र…।।1।।
काखेत लेकरु हातात झाडण
डोईवर शेणाची पाटी
कपडा न लता न खायला भत्ता
फजिती होती माय मोटी
मया भीमान
मया भीमान, भीमान माय
सोन्यान भरली ओटी…2
सोन्यान भरली ओटी…।।1।।
मोडक्या झोपडीले होती
माय मोडकी ताटी,
फाटक्या लुगड्याले होत्या
माय सतरा गाठी,
असाच घास दीला भीमान
झकास वाटी वाटी,
आहो असाच घास दिला
भीमान झकास वाटी वाटी,
मया बापान
मया बापान, बापान माय
सोन्यान भरली ओटी…
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.

