
लागली ओढ ही भक्तांच्या मनाला
कधी पाहीन कधी पूजीन
माझ्या लाडक्या गणाला ।।धृ।।
रिमझिम पडती या पावसाच्या सरी
श्रावण सरताना आस लागे उरी
आटपून कामे ही वाट बघतोय शेतकरी
लाडाचा बाप्पा हा कधी येणार माझ्या घरी
चातकापरी बघतोय वाट क्षणोक्षणाला ।।1।।
तुला वाजत गाजत देवा आणि घरात
उभी लक्ष्मी दारात तुझे कराया स्वागत
तुझी सुंदर मूर्ती ही देवा बसवूनी मखरात
मनोभावे करेन सेवा दिनरात जागून
भरतो सुखाने घर गणपती सणाला ।।2।।
:- शाहीर देवेंद्र झिमन
ऐसे ही सुन्दर भजन आप निचे दी गयी सूचि में देख सखते है
गणेश जी के भजन
विट्ठलाचे अभंग मराठी
राधा कृष्ण के भजन
कृष्णाच्या गवळणी मराठी
शिव जी के भजन
गुरुदेव के भजन
माता रानी के भजन
दादाजी धुनिवाले के भजन
साईं बाबा के भजन
देश भक्ति गीत
राम जी के भजन
फ़िल्मी तर्ज पर भजन
हनुमान जी के भजन
बधाई गीत
आरति संग्रह
चालीसा संग्रह
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.




