
राजा राणी च्या जोडीला, पाच मजली माडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
तू कुळाचा भिकारी आता आलीया भालधारी
या माडीत, गाडीत आता शंकर मल्हारी
या माडीत, गाडीत आबा शंकर मल्हारी
जत्रा, उरूस करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला
पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम
शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम
तुला मुभाचं नव्हती रं कुठं मंदिर, चावडीला
मोठा साहेब झालास, बापाला विसरलास
गेला असता स्मशानी भक्ष असता गीधाढाचं
असता महाग तू वेड्या आता बिडी-न-काडीला
तुला भीमानं माणूस केलं, तुझ्यासाठीच श्रम वेचीलं
नको विसरू भिमाचे मोल, बोल गर्वाने जय भीम बोल
भिमकार्यात ज्यानं राव कधी वेळ न दवडीला
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.



