
सहा डिसेंबर छप्पन साली
सहा डिसेंबर छप्पन साली वेद कशी ती हेरली
दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली
बुद्धं शरणंग गच्छामी
धम्ममं शरणंग गच्छमी
संघं शरणंग गच्छामी
तपुन बसला होता काळ कसा महापुरुषा वरती
देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ही धरती
काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती
सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनताही झुरती
प्रगतीचे ते युगे दिनाची गुपित माघे सारली
देशहिताच्या साठीहुनी गेला कायद्याची गाथा
नमून फक्त आयुष्यामध्ये बुद्धाचरणी तो माथा
हरपली आई हरपली माई हरपली माता अन पिता
वाली देशाचा निघून घेला कोन होईल तइसा आता
वैरिण रातीची ती मर्जी धुरंधरावर ती फिरली
सात कोटीचा प्रकाश गेला झाली जिवाची लाही
भीमापाठी या जगात आता वाली उरलेला नाही
असे म्हणूणी दलित सारे रडू लागे धाईधाई
चैत्यभूमीच्या ठिकाणी अश्रु गंगेसवे नयनी वाही
असून कोटी पिले तरीही भीम मूर्ति नाकारली
हर्ष कोपले सुख लोपले बाळाचे अन आईचे
थोर उपकार देशावरती आहे भीमाच्या शाईचे
महामानवा ने ते केले कृत्य असे नवलाईचे
बुद्ध धम्माचे रोप लाउनी फुले उमलली जाईचे
लढा देऊनी गुलामगिरीला अंधश्रद्धा ती मारली
शान जळता भारतभूची चितेवर ती पाहिली
पाहताक्षणी कालेनंडाने श्रद्धांजली वाहिली
डबडबलेल्या अश्रुंनीही महिमा त्यांची गाईली
अमर झाली भीमाची किर्ति डोळ्याने मी पाहिली
जाता जाता हृदयी ही आमुच्या मूर्ति बुद्धाची कोरली
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.
