
Krishna Tula Mi Takid Karte
कृष्णा तुला मी ताकीद करते,
कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।
गवळ्याघरी बोभाट उठला ।
माठ दह्याचे फोडू नको रे ।।1।।
रागीट तुझा पिता नंद
मार तयाचा खाऊ नको रे ।।2।।
आली गौळण कपटी राधा,
तिच्या घरात तू जाऊ नको रे ।।3।।
पाळण्यात घालूनी झोके देते,
आता मुला, तू रडू नको रे ।।4।।
वरद्या वांकड्या पेंद्या सुदामा,
ह्यांच्या डावामध्ये खेळू नको रे ।।5।।
नामा म्हणे पतित पावना,
ह्यांच्या नामा तू विसरू नको रे ।।6।।
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.

