
साजिरे गोजिरे सुंदर हासरे,॥
देवा तुझे मुख ,
गजाचे वदन द्विजाचे तन कसे हे अप्रूप
गोंडस गोलाई ,तुझ्या उदराची,
मोतिया तकाकी ,लोभस भुजांची
बुद्धीचा स्वामी तू तरी निरागस , तुझे बाळरूप
पावलात नाचे , नर्तनाची वीज ,
काव्यनाटकांची , चाले गजबज,
तुझिया भवती , ललितकलांचा , दरवळे धूप
आबालवृद्धांना ,मोह पडे तुझा
विघ्ने निवाराया , नाही कोणी दुजा
सृष्टीची पुष्टी तू , आहारविहारी , तुष्टी तू अमूप
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.

