
अनुसुयेच्या धामी आले त्रैलोक्याचे स्वामी
आले त्रैलोक्याचे स्वामी
गुलाल उधळा, उधळा सुमने
जयजयकारे घुमवा भुवने
पूर्णब्रह्म हे आले भूवर धर्मक्षरण्याकामी
फुलाफुलांनो सुगंध उधळा
विमलजलांनो सहर्ष उसळा
पवनलहरींनो मंगलवार्ता कळवा ग्रामोग्रामी
हाच सद्गुरू त्रैलोक्याचा
उद्धारक हा चराचराचा
हा योग्यांचा श्रीयोगेश्वर प्रभु हा त्रिभुवनगामी
गीत – कवी सुधांशु
संगीत – विठ्ठल शिंदे
स्वर – आर. एन्. पराडकर
गीत प्रकार – भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.

