
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया,
गणपती राया आले घरा,
वंदन करूया मोरेश्वरा,
हे गणपती राया आले घरा,
हो वंदन करूया मोरेश्वरा....
घर दार सजवली,
तोरण बांधली,
आनंदाचा दिन आला घरा,
लाडका बाळ आला गौराईचा,
देव हा आहे मोठ्या नवलाईचा,
बाप्पा हाकेला धावतो,
नवसाला पावतो,
सेवेचा लाभ चला घेऊ पुरा,
भक्तांना आवडे गणराया,
करिती सेवा भावे त्याची पूजा,
नाच नाचुनी जागती,
वरदान मागती,
वाहुनी दुर्वा लंबोदरा,
विद्यापती असे देव आमचा,
देई कलागुण गणराजा,
देव देवांना तरितो,
दुष्टांना वारितो,
गणपती सभ्याचा आहे जरा,
हिंदी · Read on Bhajan Baan
Share this bhajan with your family
Send it to your satsang group before kirtan so everyone has the words.
